Song Cover Image

कोळीगीत: होड्या निघाल्या किनारा

V6-MINI

शिडाशिडात भरारे वारा होड्या निघाल्या किनारा || धृ || फिरवा सुकाणू सारी जाली भरली मांदेली नगली करली तारली गावली गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला होड्या निघाल्या किनारा ||१|| घेवून दर्याची दौलत हाती विकून होईल कमाई मोठी पडो शिल्लक पैसा थोरा बरा होड्या निघाल्या किनारा ||२|| उभी आसलं माझी बाय पाहत वाट "कवा येईल धनी माझा परतून आज" तिच्या कालजीचा आज होईल उतारा होड्या निघाल्या किनारा ||३|| शिडाशिडात भरारे वारा होड्या निघाल्या किनारा || धृ ||