
मराठी भाषा असे धन्य धन्य बोलती जयांचे भाळी असे पुण्य कानी पडती असे हे बोल तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी जगामध्ये भारत देश महान अनेक भाषांची असे तो खाण कितीक बोलींना तेथे मान त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते. अहो ही भाषा असे कुणाकुणाची? ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता? ऐका तर मग... ही भाषा असे कुणाकुणाची? अहो ही भाषा असे कुणाकुणाची? अहो ही भाषा असे चक्रधरांची ही भाषा असे झानदेवांची तुकोबांची, नामदेव, सोपान, मुक्ताबाईची गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनाराची ही भाषा असे शुर शिवाजी राजांची ही भाषा असे सह्याद्रीच्या मुलांची सागराच्या लेकरांची विदर्भातल्या लेकीसुनांची मराठवाड्यातल्या पोरांची खानदेशातल्या वडिलधार्यांची हि भाषा असे सगळ्या मराठी प्रेमींची अशी ही भाषा कित्येक मर्दांची ज्यांनी तळी उचलली मराठीची जी जी जी लेखक, कवी, खेळाडू, साहित्यीक, नाटककार, संगीतकार, गायक, डॉक्टर, वकिल, कामगार, संशोधक, राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी, रणरागिणी, महिला, लढवय्या, सैनिक, अन शेतकरी, किती येथील महान व्यक्ती, असली नावे तरी घ्यावी किती! सारे जण महाराष्ट्री जन्मती अन सारे जण मराठी बोलती किती वाटे अभिमान, किती वाढतो आमचा मान भारत देशाचा वाढविती शान असे मराठी नरनारी आहे जगती जी जी जी १९१२, फेब्रूवारी २७, जन्मले कवी कुसुमाग्रज साजरा करती हाच मराठी भाषा दिवस करा प्रतिज्ञा याच दिनी मराठीच बोलायाचे ठेवा ध्यानी मागे नाही कधी हटायाचे सारे काही मराठीसाठी करायचे जी जी जी खानदेशी, माणदेशी आहिराणी, कोकणी वर्हाडी, मालवणी या सार्या बोलीभाषा बहिणी बहिणी सार्यांमुखी नांदती सुखाने संसार करती वंश त्यांचा बहरत राहे भुवरी जी जी जी कित्येक पुस्तके मराठीत प्रकाशीत होती कित्येक वर्तमानपत्रे मराठीत वाचली जाती आंतरजालावरही मराठीचा झेंडा फडकतो जोरदार रोजरोज नवे लेख येती, धुमाकुळ घालती फार जी जी जी मराठी भाषा असे जगन्मान्य तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य त्या मराठीस त्रिवार मुजरा करून मराठी भाषिकांना शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी मराठी भाषा असे जगन्मान्य तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य त्या मराठीस त्रिवार मुजरा करून मराठी भाषिकांना शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी

