Song Cover Image

जय गीत महाराष्ट्र देशाचे

+ Show full styles
V6-MINI

वंदन करूया स्वतंत्र भुमातेचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||ध्रृ|| येथे लढल्या कितीक लढाया भाले फेकले तलवारी परजल्या अटकेपार झेंडे रोवूनी शौर्य गाजले मराठी रक्ताचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||१|| वेरूळ अजिंठा कार्ला लेणी दगडी सौंदर्य वसले या ठाणी किल्ले शिवरायांचे भक्कम दुर्गम जलदुर्गही रक्षण करीती देशाचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||२|| धोंडे केशव भाऊराव टिळक सावरकर ताराराणी ताराबाई फुले शाहू आंबेडकर रानडे दादासाहेब यशवंतराव साने गोखले आण्णाभाऊ नाना पाटील जिजाऊ अहिल्याबाई दुर्गाबाई सिंधूताई असे धुरीण जन्मले कौतूक कितीक यांचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||३|| येथे आहे संतांची पावन परंपरा ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष खरा भक्तीच्या रंगात न्हाली ही धरती गुंजती अभंग स्वर भक्तीमय सुरांचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||४|| सह्याद्री उभा हा कणखर अभिमानी नद्या वाहती जणू अमृताचे पाणी शेतात डोलती सोनरी पिके वैभव खुलते या समृद्ध मातीचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||५|| पश्चिमेस सागरकिनारा, कोकण हिरवागार पूर्वेला विदर्भभूमी समृद्धीचा भंडार उत्तरेस खानदेशी कष्टाची असे कास दक्षिणेस सह्याद्री उभा भूषण देशाचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||६|| कला संस्कृती यांचा गंध न्यारा लावणी पोवाडा भारुडाचा झंकारा ज्ञान-विज्ञानाच्या तेजाने उजळुनी नाव झळकले मराठी जनांचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||७|| हरपले किती भूभाग सीमांच्या वाटेचे जपले स्वप्न अजुनी एकीच्या लढ्याचे मराठी मनांत धग संयुक्ततेची पूर्ण होवो स्वप्न अखंड महाराष्ट्राचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||८|| एकीच्या बळावर पुढती जाऊ महाराष्ट्र भूमीचा गौरव वाढवू जय जय महाराष्ट्र नाद घुमू दे वंदन करूया पवित्र मातृभूमीचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||९|| वंदन करूया स्वतंत्र भुमातेचे जय गीत गावूया महाराष्ट्र देशाचे ||ध्रृ||