Song Cover Image

युगुलगीत: हात हातात घेवून

+ Show full styles
V6-MINI

तो: दे हातात तुझा मला हात सजणे हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: दे हातात तुझा मला हात साजणा हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: लपून छपून प्रेम ते केले कधी कुणा नाही कळले आता वाट नको पाहू वेळ लग्नाची झाली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: कानी तुझ्या ग डूल डुले पायी पैंजण रुणझूण बोले गाली लाली येण्याची वेळ जुळूनी आली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: तू या शेताचा रे राजा येथेच आण तू बँडबाजा तुझ्या राणीची वरात मला स्वप्नात दिसली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: घराची होशील तू ग राणी कसा राहू तुजवाचूणी नको जावू आता दुर तारीख लग्नाची ठरली हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // तो: दे हातात तुझा मला हात सजणे हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली // ती: दे हातात तुझा मला हात साजणा हात हातात घेवून, तुझी माझी प्रित जमली //