
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी ||

