
बप्पा मोरया नातं!!! बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे नाते तुमचे आमचे जणू ऋणानुबंध जन्मोजन्मीचे तुमच्या पावन आगमनाने भाग्य आमचे पालटणारे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे दीपक उजळले आत्मीयतेचे भारावले वातावरण अध्यात्माने भक्तीच्या गोड सुगंधाने चराचर गाऊ लागले गोडवे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे नशीब सजले नाचत आले संकट विघ्न दूर झाले हृदयात वसलेल्य बापाने चमत्कारावर चमत्कार केले बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे जीवन मार्गी लावले कमी पडू नाही दिले केवळ तुझ्या नामस्मरणाने जन्माचे कोडे सोडवले बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

