Song Cover Image

आरती बल्लाळाची अष्टविनायक

V6-MINI

आरती बल्लाळाची जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा जयदेव जयदेव || ध्रु || देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी आत असे मुर्ती शेंदरी उघडी समोर मोठी घंटा अन खांब लाकडी वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ || जयदेव जयदेव || ध्रु || देवा तुझा वास असे पाली गावी तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ || जयदेव जयदेव || ध्रु || पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे मंदिर सुंदर मागे सरसगड वसे वर्णन म्या पामर करू कैसे सच्या एक मुढ वंदन करीतसे || ३ || जयदेव जयदेव || ध्रु ||