Song Cover Image

कोळीगीत: समींदरा रे समींदरा

V6-MINI

समींदरा रे समींदरा, तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ|| नको उधाण आणू तुज्या पाण्याला नको मस्ती करू देऊ वार्‍याला काय नको होवू देऊ त्याचे होडीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२|| नारळ पौर्णिमेचा सण आता सरला तुला सोन्याचा नारल वाढवला नेल्या होड्या त्यानं मासेमारीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३|| मी कोलीण घरला एकली सारं आवरून बाजारा निघाली म्हावरं विकून येवूदे बरकतीला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४|| एकवीरा आई माझी डोंगरावरी खणा नारळांन ओटी मी भरीन नवस केलाय मी एकविरेला तू जपून आण माझ्या घरधन्याला ||५|| पंधरा दिवस जायी तो समींदरात ते दिवस जातात माझे झुरण्यात सोनसाखली मला करण्यास तू जपून आण माझ्या घरधन्याला ||६|| तू जपून आण माझ्या घरधन्याला लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||