
आई एकवीरा हाय माजी पावन मोठी तिच्या पुजेला आनली साडी चोली आम्हा कोल्यांची देवी ही नवसाची वाट अवघड गो हिच्या मंदीराची डोंगरावर जाऊन माय बसली तिच्या पुजेला आनली साडी चोली ||१|| हळद कुंकू निरांजनाने ताट पुजेचे हे सजवीले साडी चोली बांगड्या नथ कानातले कंबरपट्टा जोडवी पैंजन पायातले तिच्या पुजेची अशी तयारी केली तिच्या पुजेला आनली साडी चोली ||२|| पायर्या हजार हजार तिच्या मंदीराला चढून जावाचो जावाचो तिच्या दर्शनाला बरो वाटतोय गो वाटतोय माझ्या मनाला नवस फेडाया निघाले आशा मला भोळीला तिच्या पुजेला आनली साडी चोली ||३||

