Song Cover Image

रूढींत गुंतल समाज

V6-MINI

रूढींत गुंतला हा सगळा समाज आहे काही न बदलणे हा इथला रिवाज आहे! रस्त्यांत बांधलेली असतात देवळे, वा रस्त्यामधेच कोणी पढतो नमाज आहे मी विनवले कितीदा त्यांना परोपरीने त्यांना परंपरांचा भलताच माज आहे! सोसून उत्सवांचे आवाज कर्णभेदी बहुतेक देव झाला बहिराच आज आहे शोधू नकोस तूही आता उपाय येथे धर्मांधळेपणावर कोठे इलाज आहे? (विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती... अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)